लंडन – विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असुन त्या पुर्वीच्या सराव सामन्यांना सुरूवात झाली असुन आज भारतीय संघाचा सराव सामना संभाव्य विजेता म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या न्युझीलंड या संघा बरोबर असणार आहे.
सामन्यापूर्वीच न्युझीलंडच्या संघाला धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा यष्टीरक्षक टॉम लॅथम हा दुखापतीमुळे जायबंदी झाला आहे. त्यामुळे त्याला दोनही सराव सामन्यांना मुकावे लागणार आहे. न्यूझीलंडचा एक सराव सामना 25 मे रोजी तर दुसरा सराव सामना 28 मे रोजी होणार आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही सामना न खेळलेला टॉम ब्लंडेल याला या दोन सराव सामन्यात यष्टिरक्षणाची संधी मिळणार आहे.