बर्मिंगहॅम – विश्वचषकात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना न्यूझीलंडविरूध्द होणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी आफ्रिकेला लुंगी एन्गिडीच्या तंदुरुस्तीबाबत समस्या होती. तथापि त्याने येथे भरपूर सराव करीत आपण शंभर टक्के तंदुरूस्त असल्याची खात्री दिली आहे.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. स्टेन याच्या अनुपस्थित त्याच्यावर आफ्रिकेच्या गोलंदाजीची भिस्त आहे. एन्गिडी म्हणाला की, मला नेहमीच आव्हाने स्वीकारण्यास आवडते. स्टेन नसल्यामुळे संघाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी पेलाविण्याची क्षमता माझ्याकडे आहे.