वेलिंगटन – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर झाला आहे. या स्पर्धेला तब्बल दोन महिने अवधी असतानाही खेळाडूंना जास्तीतजास्त सराव मिळावा यासाठी संघ लवकर जाहीर करण्यात आल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने दिली आहे.
येत्या ऑक्टोबरमध्ये अमिरातीत ही स्पर्धा होणार असून त्यासाठी या महिना अखेरपर्यंत सर्व सहभागी देशांचे संघ जाहीर करण्यात येतील.
ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत होणार असून संघाचे नेतृत्व केन विल्यमसनकडेच राखण्यात आले आहे.
संघ – केन विल्यमसन (कर्णधार), टॉड एश्ले, ट्रेंट बोल्ट, मार्क कॅम्पमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, काएल जॅमिसन, डेर्ली मिशेल, जिमी निशाम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सॅंटनर, टिम सेफर्ट, ईश सोधी, टिम साऊदी, एडम मिल्ने.