विश्‍वचषकासाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा

वेलिंग्टन – 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. 15 जणांच्या या संघाचे नेतृत्व केन विल्यमसनकडे देण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या संघात सर्व अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आलेली असून, नवोदीत टॉम ब्लंडेललाही संघात जागा देण्यात आलेली आहे. त्यासह भारतीय वंशाच्या इश सोधीला संघात स्थान मिळवण्यात यश आले. मात्र, डॉज ब्रेसवेलला संघाबाहेर ठेवण्यात आल्याने सर्व चकीत झाले आहेत, परंतु न्युझिलंडच्या संघात जलदगती गोलंदाजांचा भरणा असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

विश्‍वचषकात न्यूझीलंडचा पहिला सामना 1 जून रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांना आगामी विश्‍वचषक स्पर्धेत विक्रमाला गवसणी घालण्याची संधी असून रॉस टेलर हा चार विश्‍वचषक खेळणारा न्युझीलंडचा 7 वा खेळाडू ठरणार आहे. तर, केन विल्यम्सन, टीम सऊदी आणि मार्टिन गुप्तील यांची ही तिसरी विश्‍वचषक स्पर्धा आहे. यावेळी, न्युझीलंडच्या संघाच्या जलदगती गोलंदाजीची जबाबदारी ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मॅट हेन्री आणि लोकी फर्ग्युसन यांच्यावर असेल. तर, मिचेल सॅंटनर आणि इश सोधी हे फिरकीची धुरा सांभाळतील. जिमी निशाम व कॉलीन डी ग्रॅंडहोम अष्टपैलूच्या भूमिकेत असतील.

फलंदाजी विभागात विलियम्सन, गुप्तील, टेलर, कॉलीन मुन्रो, लॅथम, हेन्री निकोल्स यांचा समावेश आहे. यष्टिरक्षक म्हणून टॉम लॅथम यालाच पहिली पसंती असेल, परंतु ब्लंडलला राखीव यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी जाहीर केलेल्या या संघात 8 खेळाडू प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

विश्‍वचषकासाठी असा असेल न्यूझीलंडचा संघ

केन विल्यमसन (कर्णधार), मार्टीन गप्टील, हेन्री निकोलस, रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मिचेल सॅंटनर, जिमी निशम, इश सोधी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.