#CWC19 : षटकांचा वेग कमी राहिल्याबद्दल न्यूझीलंडला दंड

मॅंचेस्टर – वेस्ट इंडिजविरूद्ध विजयाचा आनंद न्यूझीलंडला खऱ्या अर्थाने घेता आला नाही. या सामन्यात षटकांचा कमी राहिल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पंच मंडळाने हा निर्णय घेतला आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. आयसीसीच्या नियमावलीनुसार न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्या एक दिबसाच्या मानधनातून 20 % रक्कम कपात केली जाणार आहे तर त्याच्या सहकाऱ्यांच्या मानधनातून 10 % रक्कम कपात केली जाईल.

न्यूझीलंडकडून पुन्हा अशा प्रकारची चूक झाली तर विल्यमसन याचा हा दुसरा गुन्हा मानला जाईल व त्याला एका सामन्यात खेळण्यास मनाई केली जाईल. विल्यमसन याने आपल्याकडून चूक झाली असल्याचे मान्य केले आहे.

मैदानावरील पंच इयान गोल्ड ब रुचिरा पल्लीगुरुगे तसेच तिसरे पंच निगेल लॉंग व चौथे पंच रॉड टुकर यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.