#ICCWorldCup2019 : नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा गोलंदाजीचा निर्णय

ब्रिस्टल – विश्‍वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असुन त्या पुर्वीच्या सराव सामन्यांना सुरूवात झाली आहे. आज वेस्टइंडिज आणि न्यूझीलंड याच्यांत सराव सामना होत आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंड संघाच्या बाजूने लागला आहे. न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत वेस्ट इंडिज संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.

दरम्यान, न्यूझीलंडचा हा दुसरा सराव सामना आहे. भारत आणि न्युझीलंड दरम्यान झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाचा तब्बल 6 गडी राखुन पराभव करत न्युझीलंडने विश्‍वचषक स्पर्धेसाठी सकारात्मक सुरूवात केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.