अबुधाबी – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयाद्वारे अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत.
इंग्लंड विरूध्द न्यूझीलंड याच्यांतील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेली ऩाणेफेकीचा कौल (टाॅस) हा न्यूझीलंड संघाच्या बाजूनं लागला आहे. (New Zealand have won the toss and elected to field) न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने क्षेत्ररक्षण स्विकारताना इंग्लंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केल आहे.
दरम्यान, इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत सुपर 12 फेरीतील 5 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत. या लढतीत इंग्लंडची फलंदाजी जास्त भक्कम मानली जात असली तरीही न्यूझीलंडचे टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, इश सोधी व मिचेल सॅंटनर या गोलंदाजांनीही प्रतिस्पर्धी संघांवर सातत्याने वर्चस्व राखले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या मधल्या फळीला जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.
2019 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक इंग्लंडनेच जिंकला होता. त्या सामन्यात पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका न्यूझीलंडला बसला होता. आता टी-20 विश्वकरंडकात पुन्हा एकदा हे दोन संघ आमनेसामने येत आहेत.