#CWC2019 : रॉस टेलर खराब पंचगिरीचा बळी

लंडन – ख्रिस व्होक्‍स आणि लियाम प्लंकेट यांच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडची तगडी फलंदाजी ढेपालल्याने न्यूझीलंडला निर्धारित 50 षटकांत 8 बाद 241 धावांचीच मजल मारता आली.

या सामन्यात रॉस टेलर 30 चेंडूत 15 धावांवर खेळत होता. त्यावेळी तो खराब पंचगिरीचा शिकार ठरला. मार्क वूडने टाकलेला चेंडू टेलरच्या पायाला लागला. चेंडू पायाला लागताच इंग्लंडच्या खेळाडूंनी अपील केले. त्यामुळे त्याला पंचांनी पायचीत बाद ठरवले. बॉल ट्रॅकिंग प्रणालीमध्ये चेंडू स्टंपच्या वरून जात असल्याचे दिसून आले, पण सलामीवीर गप्टीलने रिव्ह्यू वाया घालवल्यामुळे न्यूझीलंडकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हता. त्यामुळे त्यांना डीआरएस ची मदत घेता आली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.