नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेतील अंतिम सामना ५० षटकांत सामना टाय झाला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार सुपर ओव्हर खेळविण्यात आली. येथेही सामना टाय झाला. मग, सामन्यात सर्वाधिक चौकार मारलेल्या संघाला विजयी घोषीत करण्यात ठरले आणि इंग्लंड पहिल्यांदा विश्वविजेते बनले.
न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूपर्यंत दिलेली लढत खरोखरच कौतुकास्पद होती. त्यानंतर सर्वच स्तरातून न्यूझीलंडच्या कामगिरीचे कौतुक झाले. विश्वचषक स्पर्धेआधी भारतात झालेल्या आयपीएल लीगमुळे आमच्या खेळाडूंमध्ये परिपक्वता आली त्याचा फायदा न्यूझीलंडच्या संघाला विश्वचषक स्पर्धेत झाला अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा फलंदाज राॅस टेलर याने दिली आहे.
राॅस टेलर म्हणाला की, आयपीएल लीगचा सर्वात जास्त फायदा आमच्या खेळाडूंना झाला आहे. त्यांना या स्पर्धेमुळे अन्य देशांमधील खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली आहे. पण त्याचबरोबर भारतामधील विविध खेळपट्ट्यांवर खेळण्यामुळे आमच्या खेळाडूंमध्ये परिपक्वता आली आहे.