वेलिंग्टन- न्यूझीलंडने 8 जूनला करोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. मात्र, एका आठवड्यानंतर देशात दोन करोना बाधित रुग्ण आढळले होते. मात्र, केवळ दोनच रुग्ण आढळले तरी न्यूझीलंड सतर्क झाला आहे.
न्यूझीलंडचे पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांनी आपली चूक मान्य केली आहे. ज्यामुळे न्यूझीलंडमध्ये पुन्हा करोनाचा धोका निर्माण झाला आहे. खरे तर ब्रिटेनवरून दोन महिला न्यूझीलंडमध्ये आल्या होत्या. त्यांनी न्यूझीलंडमध्ये राहत असलेल्या आजारी नातेवाईकाला भेटण्याची परवानगी मागतली होती. न्यूझीलंडला आल्यानंतर त्या दोन्ही महिलांना 14 दिवस एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र 14 दिवस पूर्ण होण्याअगोदरच त्यांना हॉटेलमधून जाण्याची परवानगी देण्यात आली होती. नंतर त्या दोन्ही महिला करोना बाधित असल्याचे आढळून आले होते.
पंतप्रधान जसिंडा यांनी म्हटले की, “आता कुणालाही सहानुभूती दाखविण्यात येणार नाही. क्वारंटाइन पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही बाहेर सोडण्यात येणार नाही’.