#CWC19 : अपराजित्व कायम राखणारच – विल्यमसन

बर्मिंगहॅम – दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यासाठी त्यांना न्यूझीलंडविरूद्ध आज येथे होणाऱ्या लढतीत विजय अनिवार्य आहे. आतापर्यंत एकही सामना न गमविणाऱ्या न्यूझीलंडलादेखील बाद फेरीतील स्थान बळकट होण्यासाठी ही लढत महत्त्वाची आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने अपराजित्व कायम राखणारच असा विश्वास व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना तो म्हणाला, ‘आतापर्यंत आम्ही या स्पर्धेत सर्वच आघाड्यांवर सातत्यपूर्ण यश मिळविले आहे. आजची लढतही त्यास अपवाद नसणार आहे. पाकिस्तानचा संघ तुल्यबळच आहे. हे लक्षात घेऊनच आम्ही या सामन्यातही गांभीर्याने खेळणार आहोत. षटकांचा वेग राखण्याबाबत असलेल्या त्रुटी भरून काढल्या जातील’ असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.