#CWC19 : नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा गोलंदाजीचा निर्णय

बर्मिंगहॅम – विश्वचषक स्पर्धेमध्ये आज ‘दक्षिणआफ्रिका-न्यूझीलंड’ आमनेसामने असणार आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी आजचा सामना हा करो या मरो असणार आहे. जर आज आफ्रिका सामना हरली तर त्याचे सेमीफायनलमध्ये पोहचणे संपुष्टात येणार आहे. तर केन विल्यमसन याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने येथे सर्वच आघाड्यांवर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघास हरवणे हे आफ्रिकेसाठी आव्हानत्मक ठरणार आहे.

बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंड संघाने जिंकला आहे. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारत दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. पावसामुळे झालेल्या विलंबामुळं सामना 49 षटकांचा ठेवण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका संघ – हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, ऐडेन मारक्रम, फाफ डू प्लेसी, रैसी वैन डर डुसेन, डेविड मिलर, एन्डिले फेहलुकवेओ, क्रिस मॉरिस, कगिसो रबाडा, इमरान ताहिर, लुंगी एनगिड़ी

न्यूझीलंड संघ – मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, रॉस टेलर, टॉम लाथम, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, मैट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)