#CWC19 : विजेतेपद मिळविण्याचे ध्येय – विल्यमसन

मॅंचेस्टर – भारताच्या संमिश्र माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज किती टिकतात याचीच उत्सुकता आजच्या सामन्याबाबत निर्माण झाली आहे. दरम्यान सर्वोच्च कामगिरी करीत आजची लढत जिंकणारच असा विश्वास न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने पत्रकरापरिषदेत माध्यंमाशी बोलताना व्यक्त केला आहे.

आमच्यासाठी सुखकारक प्रवास झाला आहे. जरी आम्हाला पाकिस्तानकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला असला तरी हा पराभव इतिहासजमा झालेला आहे. विश्‍वचषकाच्याजवळ आम्ही पोहोचलो आहोत व आता तेथून मागे फिरणे नाहीच हीच आमच्या खेळाडूंची मानसिकता झाली आहे. सर्वोच्च कामगिरी करीत आजची लढत जिंकणारच, असे विल्यमसन याने यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.