#ICCWorldCup2019 : न्यूझीलंडचा सलग तिसरा विजय

अफगाणिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव

टॉन्टन : गोलंदाजीत वेगवान गोलंदाज जेम्स निशाम आणि लॉकी फर्ग्युसन यांची शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजीत केन विलियमसन यांच्या नाबाद 79 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडचा हा विश्वचषक स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला आहे.

शनिवारी न्यूझीलंड विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तानचा संघ 41.1 षटकात सर्वबाद 172 धावा करू शकला. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत जेम्स निशामने 5 आणि लॉकी फर्ग्युसन याने 4 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 3 गड्यांच्या मोबदल्यात 32.1 षटकांमध्ये 173 धावा करत विजय मिळवला. न्यूझीलंडकडून केन विलियमसनने नाबाद 79 धावा केल्या तर राॅस टेलरने 48 आणि काॅलिन मुनरो याने 22 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून आफताब आलमने 3 गडी बाद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.