#NZvWI 1st T20I : न्यूझीलंडचा विजय

ऑकलंड – पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे पराभव केला. या विजयासह यजमान न्यूझीलंडने टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देताना 1-0 अशी आघाडी घेतली. 

पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 16 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 16 षटकात 7 गडी गमावून 180 धावा केल्या. कॅरन पोलार्डने 37 चेंडूत 4 चौकार व 8 षटकार फटकावताना 70 धावांची खेळी केलीय. त्याला योग्य साथ देताना आंद्रे फ्लेचरने 31 तर फॅबियन ऍलनने 30 धावा केल्या.

न्यूझीलंडने 15.2 षटकांत 5 बाद 179 धावा केल्या होत्या. मात्र, त्यावेळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हा सामना डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे निकाली काढण्यात आला. त्यात यजमान न्यूझीलंडने 5 गडी राखून विजय मिळवला. त्यांच्याकडून जेम्स नशिमने नाबाद 48 तर, मिचेल सॅन्टनरने नाबाद 31 धावा केल्या. त्यापूर्वी डेव्हन कोनवेने 41 तर, ग्लेन फिलीप्सने 22 धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक – वेस्ट इंडिज – 16 षटकांत 7 बाद 180 धावा. (कॅरन पोलार्ड 70, आंद्रे फ्लेचर 31, फॅबियन ऍलन 30, लॉकी फर्ग्युसन 5-31). न्यूझीलंड – 15.2 षटकांत 5 बाद 179 धावा. (डेव्हन कोनवे 41, ग्लेन फिलीप्स 22, जेम्स नशिम नाबाद 48, मिचेल सॅन्टनर नाबाद 31, ओशेन थॉमस 2-23).

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.