आॅकलंड : मार्टिन गप्टिल आणि टिम सीफर्ट यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने मालिकेतील दुस-या टी-20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी १३३ धावांचे आव्हान ठेवले आहे. पाच टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
Innings Break!#TeamIndia bowlers restrict New Zealand to a total of 132/5 after 20 overs.
Scorecard – https://t.co/q1SS955DVL #NZvIND pic.twitter.com/MvGg34rPJ3
— BCCI (@BCCI) January 26, 2020
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १३२ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून फलंदाजीत मार्टिन गप्टिलने ३३(२०), काॅलिन मुनरो २६(२५), केन विल्यमसनने १४(२०), ग्रैंडहोमने ३(५), राॅस टेलरने १८(२४) आणि टिम सीफर्टंने नाबाद ३३(२६) धावांची खेळी केली.
A late Tim Seifert flurry pushes the total to 132/5. Seifert and Guptill the joint top scorers with 33. Chase coming up soon. LIVE scoring | https://t.co/t55dhYlIPh #NZvIND pic.twitter.com/vksG3hr6BD
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 26, 2020
भारताकडून गोलंदाजीत रविंद्र जडेजाने ४ षटकांत १८ धावा देत सर्वाधिक २ गडी बाद केले. तर शिवम दुबे, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. युजवेंद्र चहल व मोहम्मद शमीला एकही विकेट मिळाली नाही.