नवे राष्ट्रीय युवा धोरण लवकरच- किरेन रिजिजू

मानसिक आरोग्य अत्यंत महत्वाचा असा जागतिक विषय

पुणे – मानसिक आरोग्य हा एक अत्यंत महत्वाचा असा जागतिक विषय बनला आहे. जेव्हा एखादा देश विकासाच्या दिशेने वाटचाल करतो, प्रगती करतो तेव्हा देशातील लोकांचे मानसिक प्रश्न अधिक बळकट होत जातात. जेव्हा आपण उच्च शिक्षण घेतो, जेव्हा आपले जीवन हे उच्च तंत्रज्ञ होते तेव्हा अशा प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. जपानसारखे देश किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये मानसिक आरोग्याचा प्रश्न हा मोठ्याप्रमाणावर आढळतो. त्यातुलनेत आफ्रिकन देश किंवा इतर अविकसित देशांमध्ये अश्याप्रकारे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडल्याचे प्रमाण खूपच नगण्य असल्याचे दिसून येते, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री, युवा कार्यक्रम व क्रीडा किरेन रिजिजू यांनी केले.

सिंबायोसिस सेन्टर फॉर इमोशनल वेल- बिइंग, एसआययू व एमपॉवर यांच्या संयुक्तविद्यमाने २ दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .”Raising Resilient Youth: from University to Community” हा या आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्रमुख विषय होता. सदर परिषदेसाठी मुख्य भाषण करण्यासाठी श्री किरेन रिजिजू यांना आमंत्रित करण्यात आले होते.

रिजीजू म्हणाले, भारत एक विकसनशील राष्ट्र आहे. इथे सर्वत्र स्पर्धात्मक वातावरण आहेआणि म्हणूंनच आपल्या देशातील विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या या मोठ्याप्रमाणात उद्भवत आहेत. आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अगदी १०० टक्के जरी असले तरीही आपण विकसित राष्ट्र होऊ शकत नाही कारण, आपण किती हुशार आहोत किंवा एखादा विषय आपल्याला किती चांगल्या प्रकार माहिती आहे हे पुरेसे नसून आपली उत्पादकता व आउटपुट देण्याची क्षमता किती आहे यावर आपल्या देशाच्या विकासाची व्याख्या ठरते. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात यशासाठी शैक्षणिक उत्कृष्टता आवश्यक ठरते आणि विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनाचे ज्ञान देण्याची सिंबायोसिस संस्थेची परंपरा आहे.

आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेविषयी बोलताना माननीय मंत्री म्हणाले, आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या देशातील तरुणाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. देशातील तरुण पिढीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतल्यास एक उज्वल राष्ट्र घडवण्यास नक्कीच मदत होईल. सिंबायोसिस सारख्या संस्थांना/ विद्यापीठांना हे योग्यरीत्या समजले आहे व ते आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवीत आहेत. आम्ही नवीन युवा धोरण” तयार करीत आहोत जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- एनईपी २०२० चा विस्तार असेल. जिथे तंदुरुस्ती आणि खेळ यावर अधिक जोर देण्यात येईल. आपल्याला भारताला एक उत्तम क्रीडा राष्ट्र बनवायचे आहे. ” “खेलो इंडिया” हा भारत सरकारचा उपक्रम आहे जिथे विद्यापीठ स्तरावर खेळले जाणारे खेळ हे खरोखर जागतिक दर्जाचे आहेत. भारत सरकारने “फिट इंडिया” मोहीम” देखील सुरू केली त्याअंतर्गत भारतातील विद्यापीठांनी नेतृत्वाची भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे.

भाषणाच्या शेवटच्या सत्रात श्री.रिजीजूं यांनी सर्वाना एक अमूल्य सल्ला दिला, ते म्हणाले, “जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होते तेव्हाच तो जीवनाच्या सर्व बाबींमध्ये यशस्वी होते. केवळ क्रीडा क्षेत्रातीलच व्यक्ती नव्हे तर प्रत्येक भारतीय व्यक्ती तंदुरुस्त असायला हवी. फिट इंडिया” मोहिमेअंतर्गत नुकत्याच झालेल्या नोंदीनुसार भारताची तंदुरुस्तीची पातळी ही मोठ्याप्रमाणावर वाढलेली आहे. संसद सदस्य, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती हे स्वत:ला तंदुरुस्त ठेवत आहेत.

डॉ. शां.ब. मुजुमदार कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले कि, सिंबायोसिस हे आरोग्यहितास प्राधान्य देणारे विद्यापीठ आहे. येथे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली ज़ाते. “आयसोलेशन” हा आता जगातील एक मोठा आजार बनला आहे. आपणसर्व तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांशी जोडले गेलेलो असलो तरीही आपण एकटे आहोत. देशाची युवापिढी ही देशाच्या विकासाचे इंजिन आहे. आपला देश हा जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्येचा देश आहे. आपल्या देशातील तरुण वर्ग हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तर तरच आपला विकास शक्य आहे. आपल्या देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.