नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रेल्वेची भाडेवाढ लागू होणार आहे. उपनगरी रेल्वे वगळता अन्य रेल्वेगाड्यांची भाडेवाढ उद्या (दि. 1 जानेवारी) पासून लागू होणार आहे, असे रेल्वेने जाहीर केले आहे. उपनगरी रेल्वेगाड्यांच्या तिकीटांच्या दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
सर्वसामान्य बिगर एसी, बिगर उपनगरीय आणि एसी श्रेणीच्या तिकीटांमध्ये प्रति किलोमीटर 4 पैसे या प्रमाणे वाढ करण्यात आली आहे.शताब्दी, राजधानी आणि दुरंतो या प्रीमियम गाड्यांच्या भाडेवाढीत समावेश आहे.
दिल्ली-कोलकाता राजधानी या 1,447 कि.मी. अंतराचा प्रवास असलेल्या गाडीची भाडेवाढ प्रति किलोमीटर 4 पैसे दराने 58 रुपये इतकी होईल. आरक्षण शुल्कामध्ये आणि सुपरफास्ट शुल्कामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि भाडेवाढ आधीपासूनच आरक्षित तिकिटांना लागू होणार नाही.