जगातील अनेक देशांमध्ये अजूनही कोरोनाचा कहर सुरू आहे. सध्या कोरोनामुळे रशियाची परिस्थिती बिकट झाली आहे. कारण या दिवसांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या नवा रेकॉर्ड नोंदवत आहेत. तसेच ब्राझीलमध्येही कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
अमेरिकेत कोरोनाच्या केसेसे हळूहळू कमी होत आहेत, परंतु अजूनही कोरोनामुळे १ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. जॉन हापकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार जगभरात कोरोनाच्या केसेस वाढून २४ कोटींच्या वर गेल्या आहेत. तर ४८.८ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
रशियात कोरोनाने पुन्हा भयानक रुप धारण केल्याचे दिसत आहे. रशियामध्ये पहिल्यांदाच कोरोनामुळे एका दिवसात मृत्यू होण्याची संख्या १ हजार पार होत आहे. एपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, रशियात गेल्या २४ तासांत ३३ हजार २०८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १ हजार २ जणांचा मृत्यू झाला आहे.
रशिया सध्या कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना करत आहे. पहिल्या शुक्रवारी रशियात एका दिवसांत ९९९ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली होती. रशियातील आता कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ४ हजार ७५०वर पोहोचली आहे.
अमेरिकेतील पहायला गेले तर, पहिल्यापेक्षा अमेरिकेतील नव्या कोरोनाबाधितांची संख्येत कमी झाली आहे. परंतु अजूनही कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव जात आहेत. अमेरिकेचे वृत्तपत्र ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या टॅलीनुसार १५ ऑक्टोबरला अमेरिकेत सात दिवसांत ८४ लाख २४५ रुग्णांची नोंद झाली होती. तर मृत्यूची संख्या १ हजार ५८७ नोंद झाली होती.
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ४८ लाख ८३ हजार ६०३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७ लाख २३ हजार ७४७ जणांचाय मृत्यू झाला आहे. अजूनही जगातील कोरोनाच्या यादीत अमेरिका प्रथम स्थानावर आहे.