नेवाशात मतदानाचा टक्का घसरला

पाच लाख 61 हजार 842 मतदारांनी फिरवली पाठ; शिर्डीत सर्वाधिक मतदान
विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी

33 तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क

शिर्डी मतदारसंघात तृतीयपंथीयांचे एकून 73 मतदारांची नोद असून, त्यापैकी 33 तृतीयपंथीयांनी मतदान केले आहे. सर्वाधिक मतदान श्रीरामपूर तालुक्‍यात असून, 56 पैकी 30 जणांनी मतदान केले आहे. शिर्डी मतदारसंघात 11 मतदारांची नोंद असून, त्यापैकी एकाने मतदान केले.

नगर – शिर्डी लोकसभा मतदारसंघात 15 लाख 84 हजार 303 मतदार आहते. त्यापैकी दहा लाख 22 हजार 461 मतदारांनी लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला. परंतु नेवाशात मतदानाचा टक्का घसरला असल्याचे आकडेवारी मध्ये समोर आले आहे.

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगासह सामाजिक, राजकीय संस्थांसह अन्य घटकांनी प्रयत्न केले. मतदानाचा हक्‍क बजावण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघात तब्बल दहा लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदान केले. परंतु अनेक विधानसभा मतदारसंघांत मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याचेही आकडेवारीमध्ये समोर आले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सोमवरी मतदान पार पडले. या मतदारसंघात अकोले, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर आणि नेवासा या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जाहिरातीसह गावोगावी जाऊन मतदान यंत्रांची माहिती देने, मतदानचा हक्‍क बजावण्याबाबत जनजागृती करण्यात आली होती. तसेच महिलांचे मतदान वाढविण्यासाठी प्रायोगित तत्वावर सखी मतदार केंद्र ही संकल्पना राबविण्यात आली. या मतदान केंद्रावर सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करू देण्यात आल्या. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात 64.54 टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये पुरुषांचे 68.06 टक्के, तर महिलांचे 60.74 टक्के मतदना झाले. निवडणूक आयोगाने मतदार यादीत तृतियपंथीयांची नोंद केली. शिर्डी मतदार संघात 45 टक्के मतदान तृतीयपंथीयांनी केले.

अकोले – 2 लाख 53 हजार 576 मतदारांपैकी 1 लाख 61 हजार 157 मतदारांनी मतदान केले असून, 92 हजार 419 मतदारांनी पाठ फिरविली. संगमनेर : 2 लाख 67 हजार 430 मतदारांपैकी 1 लाख 77 हजार 678 मतदारांनी मतदाराचा हक्‍क बजावला. या मतदार संघात 89 हजार 752 मतदारांनी मतदान केले नाही. शिर्डी : 2 लाख 60 हजार 837 मतदारांपैकी 1 लाख 74 हजार 480 मतदारांनी मतदान केल असून, 86 हजार 357 मतदारांनी पाठ फिरवली. कोपरगाव : 2 लाख 60 हजार 128 मतदार होते. त्यापैकी 1 लाख 69 हजार 259 मतदारांनी मतदान केले. सुमारे 90 हजार 859 मतदारांनी मतदान केले नाही. श्रीरामपूर : 2 लाख 84 हजार 654 मतदारांपैकी 1 लाख 85 हजार 180 मतदारांनी मतदान केले असून, 99 हजार 474 मतदारांनी पाठ फिरविली. नेवासा : 2 लाख 57 हजार 678 मतदार होते. त्यापैकी 1 लाख 54 हजार 707 मतदारांनी मतदान केले. सुमारे 1 लाख 2 हजार 971 मतदारांनी मतदान केले नाही. सर्वाधिक कमी मतदान नेवासा मतदारसंघात झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.