पुणे: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित लवकरच एक वेब सिरीज येणार आहे. या वेब सिरीज चे दिग्दर्शन ‘द लंच बॉक्स’ मुळे चर्चेत आलेले रितेश बात्रा हे करणार आहेत. या वेब सिरीज मध्ये अभिनेत्री विद्या बालन हि मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
लेखिका सागरिका घोष यांनी लिहिलेल्या ‘इंदिरा: इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित ही वेब सिरीज असणार आहे. विद्या बालन हिची हि पहिलीच वेब सिरीज असून या सीरिजच्या निर्मितीसाठी विद्याने या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना विद्या म्हणाली, हि माझी पहिलीच वेब सिरीज असून, आम्ही सगळे सध्या या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत. हे काम अतिशय मेहनतीचे असल्याने वेगवेगळ्या प्रसंगाची माहिती करून घेण्यासाठी वेळ लागत आहे. या वेब सिरीजची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांची असणार आहे.