प्रिया वॉरियरचा व्हिडीओ व्हायरल : कितीही पडले; तरी परत उभी रहातेच

चित्रीकरणावेळचा प्रसंग केला शेअर

चेन्नई – 2018 मध्ये आलेल्या “ओरु अदाल लव्ह’ या सिनेमातील गाण्यातील 14 सेकंदाच्या नेत्रपल्लवीच्या व्हिडीओमुळे देशभर लोकप्रिय झालेल्या प्रिया प्रकाश वॉरियरला इंटरनेट सेन्सेशन म्हणूनच ओळखले जाते. लॅमरस फोटो पोस्ट करत प्रिया तिच्या चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. नजरेने घायाळ करणाऱ्या प्रियाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

नुकताच प्रियाचा आणखी एक व्हिडीओ वायरल झालाय. “चेक’ सिनेमाच्या सेटवरचा हा व्हिडीओ आहे. प्रिया अभिनेता नितीन सोबत या सिनेमातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. येत्या 26 तारखेला प्रियाचा “चेक’ हा तेलगू सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात नितीन सोबतच अभिनेत्री रकुल प्रीत सिंहदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

याच सिनेमाच्या गाण्याचं शूटिंग सुरु असताना प्रिया जमिनीवर कोसळली. या व्हिडीओत प्रिया पळत येऊन अभिनेता नितीनच्या खांद्यावर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. मात्र प्रियाची पकड सुटल्याने ती जमिनीवर कोसळली. प्रिया पडल्यानं लगेचच सेटवरच्या इतरांनी प्रियाला उचलण्यासाठी धाव घेतली.तिला हाताला धरुन उभं केलं.

या प्रसंगाचा एक व्हिडीओ स्वत: प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जोरात पडल्यानंतरही प्रियानं आपण ठिक असल्याचं म्हणत ती लगेचच पुढच्या शुटींगसाठी तयार झाली. या व्हिडीओला प्रियाने एक खास कॅप्शनही दिलंय. “हे आयुष्य कायम माझ्याशी लंपडाव खेळत, मला खाली खेचण्याचा प्रयत्न करत..मात्र प्रत्येक वेळी उठून उभी राहते.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.