नवी दिल्ली – इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च या संस्थेने विकसित केलेले 35 पिकांचे नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाजारात आणले आहेत. या वाणांचे पिक कुपोषण आणि वातावरणातील बदलासाठी उपयुक्त असल्याचा दावा केला जात आहे.
पंतप्रधान मोदीं यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे वाण बाजारात उपलब्ध करण्यात आल्याची घोषणा केली. या पिकांचे वाण अनेक बाबतीत वैशिष्ट्यपुर्ण आहेत. काही वाण दुष्काळी भागातही विपुल प्रमाणात पिक उत्पादन करू शकतात असा आयसीएआरचा दावा आहे. यातील काही पिकांमध्ये पोषण मुल्य मोठे आहे. त्याचा उपयोग कुपोषणग्रस्त भागातही करता येईल.
यावेळी बोलताना कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की देशातील 86 टक्के शेतकरी अल्पभुधारक असून त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे असा पंतप्रधानांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. शेतकरी हा कोणाच्या मदतीवर किंवा कोणाच्या दयेवर अवलंबून राहता कामा नयेत ते स्वताच्या बळावर व स्वत:च्या पायावर उभे राहायला हवेत अशीही पंतप्रधानांची भूमिका आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रूपाला, कैलाश चौधरी, शोभा करंदलजे, आदि यावेळी उपस्थित होते.