मुंबई – 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘कुली नंबर 1’चा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, काहीदिवसांपूर्वी या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. ‘कुली नंबर 1’ चित्रपटात अभिनेता ‘वरून धवन’ आणि अभिनेत्री ‘सारा अली खान’ ही धमाकेदार जोडी दिसून येणार आहे.
दरम्यान, आता लॉकडाऊनमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला असल्याची हिंट वरुनने दिली आहे. वरुणनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये वरुण उर्फ राजू कुली मास्क लावून दिसतोय. यासह त्याने लिहिले की, ‘कुली नंबर 1.आम्ही हसवायला येऊ, हे वचन आहे.’
या पोस्टरशिवाय वरुणने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये जावेद जाफरी, परेश रावल, राजपाल यादव आणि साहिल वेद या चित्रपटाच्या कलाकारांसोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. यापूर्वी हा चित्रपट 2 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण थिएटर बंद पडल्यामुळे आता 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
‘कुली नंबर 1’ चित्रपटाचे निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन करणार असून, हा त्यांचा 45 वा चित्रपट असणार आहे.