‘मुलगी झाली हो’ मालिकेत नव्या बदलाची नांदी

घरात हक्कांचं स्थान मिळाल्यानंतर आता माऊचं होणार बारसं

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिका आता अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतल्या माऊने आपलं संपूर्ण बालपण वडिलांच्या तिरस्कारामध्ये घालवलं. तिचं तोंड पहाणं हा देखिल अपशकून समजला जायचा. त्याच माऊचा लक्ष्मीच्या पावलांनी सन्मानाने गृहप्रवेश झाला आहे.

माऊच्या वडिलांना आता खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला आहे आणि म्हणूनच माऊला लेकीचा सन्मान देऊन त्यांनी जुनाट विचारांना झुगारुन लावलं आहे. या लाडक्या लेकीच्या तिरस्कारापायी कुणी तिचं बारसंही केलं नाही. आईने लाडाने माऊ हाक मारली आणि सर्वांचीच ती लाडकी माऊ झाली. मुलगी म्हणून मनापासून स्वीकारल्यानंतर आता माऊचं बारसं होणार आहे. माऊचं नाव नेमकं काय ठेवलं जाईल याची नक्कीच उत्सुकता असेल.

मालिकांच्या इतिहासात आजवर अशी घटना कधीही घडलेली नाही. मुलगी झाली हो मालिकेतलं हे वळण म्हणजे नव्या बदलाची नांदी म्हणायला हवं. लेखिका रोहिणी निनावे यांच्या लेखणीतून हा अत्यंत भावनिक प्रसंग लिहिला गेला आहे. मालिकेत माऊचा नव्याने जन्म होतोय असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही.

माऊसारख्या अनेक निरागस लेकींना या मालिकेच्या निमित्ताने जगण्याची नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. तेव्हा मुलगी झाली हो मालिकेतलं हे भावनिक वळण पाहायला विसरु नका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.