हाऊसिंग इंडस्ट्रीत नवा ट्रेंड (भाग-२)

अलिकडेच रिअल इस्टेट सेक्‍टरने नवीन योजना सुरू केली आहे. त्याला स्टुडंट हाऊसिंग असे नाव दिले आहे. स्टुडंट हाऊसिंगनुसार कुटुंब, शहर सोडून दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलपेक्षा चांगली सुविधा प्रदान केली जात आहे.

हाऊसिंग इंडस्ट्रीत नवा ट्रेंड (भाग-१)

स्टुडंट हाऊसिंग म्हणजे काय?
स्टूडंट हाऊसिंग हा दोन कंपन्यातील करार आहे. त्यात एक कंपनी केटरिंग आणि अन्य सेवाशी निगडीत असते. तर दुसरी कंपनी ही कोणतीही रिअल इस्टेट कंपनी असते. करारानुसार रिअल इस्टेट कंपनी ही राहण्याची सुविधा उपलब्ध करून देते तर दुसरी कंपनी किंवा स्टार्टअप हे खाण्याची आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. ही सर्व प्रक्रिया दोन्ही कंपन्या एकत्र येऊन पार पाडत असतात. रिअल इस्टेट कंपनी ही आपली जागा दुसऱ्या कंपनीला पाच ते दहा वर्षांसाठी करारावर भाड्याने दिसू शकते.

कोणत्या सुविधा?
स्टुडंट हाऊसिंगनुसार महानगरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पंचतारांकित सुविधा दिली जात आहे. यात राहण्याची जागा, उत्तम दर्जाचे जेवण हे तर आहचे त्याचबरोबर कॉलेज, विद्यापीठाला ये जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय कपडे धुलाई केंद्र, बेडशिट, चादरी बदलणे, साफसफाई, इनडोअर-आऊटडोर गेम्स, विकेएंडला विविध स्पर्धा, पर्यटन, भ्रमंती, ट्रेकिंग यासारख्या सुविधा दिल्या जात आहेत.

शुल्क आकारणी :
स्टुडंट हाऊसिंगतंर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा पाहता विद्यार्थ्यांना फार काही शुल्क आकारले जात नाही. सर्वसाधारणपणे कंपनीने हे शुल्क तीन श्रेणीत विभागून दिले आहे. यात डिलक्‍स, सेमी प्रिमियम, प्रिमियम श्रेणीचा समावेश आहे. प्रिमीयम श्रेणीत प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा 18 ते 20 हजार रुपये भाडे भरावे लागते तर सेमी प्रिमियमसाठी 15 ते 17 हजार आणि डिलक्‍स श्रेणीसाठी 11 ते 14 हजार रुपये खर्च करावे लागतात. साधारणपणे कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये पाच ते आठ हजार दरमहा वसूल केले जाते आणि तेवढीच रक्कम जेवण्यावरही खर्च होते. अशा स्थितीत महिन्याचा खर्च हा 15 हजाराच्या आसपास पोचतो. त्यानुसार एवढ्याच खर्चात स्टुडंट हाऊसिंगमध्ये दर्जेदार सुविधा दिल्या जात असताना हा खर्च खिशाला परवडणारा ठरू शकते. विद्यार्थ्यांना हा पर्याय चांगला ठरू शकतो.

कोणत्या कंपनीकडून सुविधा?
आजघडीला भारतात डझनभर कंपन्या अशा प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांना प्रदान करत आहेत. यात प्लेसिओ, योहो, स्टुडंटको यासह अनेक कंपन्या प्रमुख महानगरात स्टुडंट हाऊसिंग सुविधा पुरवत आहेत. प्लेसिओचे संस्थापक आणि सीइओ रोहित पटेरिया यांच्या मते, विद्यार्थ्यांना पंचतारांकित सुविधा देण्यासांठी आम्ही अनेक सेवा देणाऱ्या संस्था आणि कंपन्यांशी करार केले आहेत. त्यात खानपान, लॉंड्री, आरोग्य, परिवहन यासारख्या सुविधांचा समावेश आहे. स्टुडंट हाऊसिंग बाजार आता सुमारे 500 कोटी रुपयांच्या आसपास पोचला आहे. सध्या दिल्ली एनसीआरमध्ये सुमारे दहा हजार बेडची गरज आहे तर देशात येत्या 15 वर्षात सुमारे 5 कोटी बेडची गरज भासणार आहे. यावरून स्टुडंट हाऊसिंगचे महत्त्व लक्षात येते.

– कमलेश गिरी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.