लिथियम-आयन बॅटरीचे आयुर्मान दुप्पट करणारे नवे तंत्रज्ञान विकसीत ?

नवी दिल्ली – लिथियम-आयन बॅटरीच्या इलेक्‍ट्रोड्‌सना कार्बन कोटिंग करण्याचे स्वस्त तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित केले आहे. हे संरक्षक कार्बन कोटिंग असलेले इलेक्‍ट्रोड्‌स वापरून तयार करण्यात आलेल्या लिथियम आयन बॅटरीचे आयुर्मान दुप्पट होईल असा अंदाज आहे.

विजेवर चाणाऱ्या वाहनांसाठी लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात येतात. परंतु पेट्रोलियम इंधनांवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढवण्यासाठी विजेवरील वाहनांच प्रतिमैल खर्च कमी होण्यासाठी त्या वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरीच्या आयुर्मानात वाढ करणे आवश्‍यक आहे.

विद्युतउर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा प्रति मैल वेग व माइलेज लिथियम आयन बॅटरीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. ही कार्यक्षमता 80% ने कमी होण्यापूर्वी ती बॅटरी किती वेळा चार्ज केली गेला यावर त्या विद्युत बॅटरीचे आयुर्मान अवलंबून असते.

अक्‍टिव मटेरियलवरील कार्बन कोटिंग हा लिथियम-आयन बॅटरीचे आयुष्य वाढवतो. परंतू लिथियम मेटल ऑक्‍साईडवर कार्बन कोटिंग करणे आव्हानात्मक असते. कारण लिथियम मेटल ऑक्‍साईड पदार्थावरील प्रक्रियेदरम्यात एकाच टप्प्यात तो चढवणे आवश्‍यक असते.

या समस्येवर मात करण्यासाठी, इंटरनॅशनल अडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्थेने लिथियम ट्रान्झिशन मेटल ऑक्‍साईड प्रक्रियेदरम्यान एकाच टप्प्यात कार्बन कोटिंग करण्याची प्रक्रिया विकसित केली आहे.

“एआरसीआय’मधील संशोधकांनी ही प्रयोगशाळेतील विकसित पद्धत आर्थिक दृष्ट्‌या परवडण्याजोगी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्यास अधिक परिणामकारणता दाखवेल अशी आशा व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.