सिडनी – ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत एका स्पर्धेतील सामन्याचा निकाल अत्यंत आश्चर्यकाररित्या लागला आहे. या सामन्यात ना नाणेफेक झाली ना एकाही चेंडूचा खेळ झाला तरीही एका संघाला विजेता घोषित करण्यात आले. चीनसह जगभरात पसरत असलेल्या कोरोना विषाणूंचा धोका लक्षात घेता सामना खेळविण्यापेक्षा साखळीत सर्वाधिक सामने जिंकणारा संघ विजयी ठरला. हे घडले येथील मानाच्या शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत.
या स्पर्धेचा अंतिम सामना प्रत्यक्षात खेळविण्यातच आला नाही. स्पर्धेतील न्यू साऊथ वेल्स संघाने साखळीतील सर्वाधिक सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले होते, त्याच आधारे त्यांना विजेता घोषित केले गेले.
Due to these changes, New South Wales has been declared the Marsh Sheffield Shield champions after leading the competition through nine rounds.
MORE INFO I https://t.co/y9WyTuvERR
— Cricket Australia (@CricketAus) March 17, 2020
गुणांच्या तालिकेत व्हिक्टोरियाचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. ते न्यू साऊथ वेल्सपेक्षा 12 गुणंनी मागे होते. न्यू साऊथ वेल्सने या स्पर्धेतील 6 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले होते, त्याचाच त्यांना लाभ झाला.