अमराळे ज्वेलर्सचे हडपसरमध्ये नवीन शोरुम

पुणे – शुध्द सोन्यासाठी आणि पारदर्शक व्यवहारासाठी प्रसिध्द असणारी सुवर्णपेढी म्हणजेच अमराळे ज्वेलर्स आहे. 1996 पासून शिवाजी रोड शोरूममधून सुरू झालेली ही सुवर्णपरंपरा पुढे लक्ष्मी रोडच्या मुख्य प्रवाहात आली. त्यानंतर पिरंगुट येथील अमराळे ज्वेलर्सच्या नव्या शोरूमने मुळशीकरांची मने जिंकून घेतली. पुणेकरांच्या प्रेमाच्या बळावर या रौप्यमहोत्सवी वर्षात अमराळे ज्वेलर्सच्या नव्या शोरूमचा हडपसरमध्ये शुभारंभ आमदार चेतन तुपे व मातोश्री कृष्णाबाई अमराळे यांच्या हस्ते झाला.

या वेळी माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, प्रशांत जगताप, संभाजी ब्रिगेडचे प्रांताध्यक्ष प्रवीण गायकवाड, पुणे जिल्हा बॅंकर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, पुणे पीपल्स बॅंकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे, आ.मेधा कुलकर्णी, आबासाहेब शिंदे, अनिल तुपे, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, डॉ. सतिश देसाई, रवि चौधरी, पोलीस उपअधीक्षक राहूलकुमार येवले, एम.ई.ए.चे अध्यक्ष अंकुश असबे व सागर तुपे उपस्थित होते.
अमराळे ज्वेलर्सने सोनेरी-रूपेरी ऑफर जाहीर केलेली आहे. या ऑफर अंतर्गत 14 ऑक्‍टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत दागिने खरेदी करणाऱ्यांना घडणावळीमध्ये 25% सूट देण्यात येत आहे. 50 भाग्यवंतांना मोफत हेलिकॉप्टर राईडद्वारे पुणे दर्शन करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. हि ऑफर अमराळे ज्वेलर्सच्या लक्ष्मी रोड, पिरंगुट आणि हडपसर या तीनही दालनात लागू आहे, असे स्वप्निल अमराळे व सौरभ अमराळे सांगितले.

श्रीमंतहार, राणीहार, गंठण, मोहनमाळ, नेकलेस, कर्णफुले, ब्रेसलेट, अंगठी, चेन असे सोने, चांदी व हिऱ्यातले अलंकार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पारंपरिक दागिने, मंगळसूत्र तसेच मॉडर्न रोज गोल्ड, स्टर्लिंग सिल्व्हर डिझायनरद्वारा डिझाईन पण करून दिले जातात. ग्राहकांचा प्रतिसाद हडपसर शोरूमलाही लाभेल अशी खात्री अमराळे ज्वेलर्सचे बाळासाहेब अमराळे यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.