राजकीय जाहिरातींसाठी फेसबुकचे नवे नियम

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी फेसबुकने स्वतःच्या व्यासपीठांवर दिसणाऱया राजकीय जाहिरातींच्या पद्धतींमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. फेसबुक वापरकर्ते आता राजकीय जाहिरातींना पब्लिश्‍ड बाय (जाहिराती कोणी प्रसिद्ध केल्या आहेत) किंवा पेड फॉर बाय (कोणी याचा खर्च उचलला आहे) या माहितीसह दिसतील.

फेसबुक एक ऍड लायबेरीवर देखील काम करत असून यात वापरकर्ते राजकारणाशी संबंधित जाहिरातींबद्दल अधिक माहिती मिळवू शकतील. वापरकर्ते यात जाहिरातीची प्रभावकक्षा, खर्च आणि जाहिराती पाहणाऱ्य़ा लोकांबद्दल माहिती मिळवू शकतील.

आगामी आठवडयांमध्ये राजकीय जाहिराती चालविणाऱ्य़ा पेजचे व्यवस्थापन पाहणाऱ्य़ाचे कंट्री लोकेशन पाहता येणार आहे. या सुविधेमुळे पेज नेमके कुठले आहे. हे समजण्यास मदत होणार आहे. मार्च महिन्यात भारताजवळ स्वतःचा ऍड लायब्रेरी अहवाल असेल आणि यामुळे ऍडचे इनसाइट्‌स पाहण्यास मदत होणार आहे. ही वैशिष्टये 21 फेब्रुवारीपर्यंत सामील होणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.