मुंबई – पूजा चव्हाण प्रकरणातील ज्या 12 ऑडिओ क्लिप्स होत्या, त्यामध्ये छेडछाड करण्यात आली आहे. हे सगळं कोणत्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून केलं जात आहे, हे समोर आलं पाहिजे. संजय राठोड यांना वाचवण्याचा ठाकरे सरकारकडून प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.