नवी दिल्ली – राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लाल हत्याकांडात धक्कादायक खुलासे होत आहेत. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, पाकिस्तानी हैंडलर हत्येतील आरोपी रियाझ अटारी आणि गौस मोहम्मद यांचे ब्रेनवॉश करत होते. ते भारतातील मोठ्या घटनांना सतत चिथावणी देत होते. एवढेच नाही तर नुपूर शर्माच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानी हैंडलरने रियाझ आणि गौस यांना भारतात असा स्फोट घडवून आणा, की संपूर्ण देश हादरून जावा, असे सांगितले होते.
आता एनआयएने दयपूर हत्याकांडाचा तपास सुरू केला आहे. आज एनआयएची टीम दोन्ही आरोपींना जयपूर कोर्टात हजर करणार आहे. गुप्तचर विभागाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी हँडलर सलमान हैदर आणि अबू इब्राहिम यांनी कन्हैयालालचे मारेकरी रियाझ अत्तारी आणि गौस मोहम्मद यांचे ब्रेनवॉश केले होते. रिपोर्ट्सनुसार, जेव्हापासून नुपूर शर्माचे वक्तव्य समोर आले आहे, तेव्हापासून या दोघांना देशात मोठा स्फोट घडवण्यासाठी भडकवले जात होते.
दोन्ही आरोपी आरडीएक्सच्या जुगाडात गुंतले होते
गुप्तचर विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की,’दोन्ही आरोपी जेव्हाही पाकिस्तानी हँडलरशी बोलायचे तेव्हा त्यांना इस्लामसाठी काहीतरी मोठे करण्यासाठी भडकवले जात असे. हे दोन्ही आरोपी बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्स मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आता एनआयए या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, त्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपी रियाझ आणि गौस मोहम्मद अजमेरच्या उच्च सुरक्षा तुरुंगात बंद आहेत. शुक्रवारी एनआयएने दोघांनाही ताब्यात घेतले. कडेकोट बंदोबस्तात या दोघांना घेऊन NIA जयपूरला पोहोचली आहे. येथील एनआयए न्यायालयात या दोन आरोपींना हजर करण्यात येणार आले. यासोबतच या दोघांचीही चौकशी करण्याची तयारी सुरू आहे.’
उदयपूरमध्ये आज चौथ्या दिवशी इंटरनेट बंद आहे
दरम्यान,उदयपूर हत्याकांडानंतर शहरात चौथ्या दिवशी शुक्रवारीही इंटरनेट बंद होते. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उदयपूरमध्ये इंटरनेट बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याशिवाय जयपूर, अलवर आणि दौसा येथेही इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचवेळी, सर्व हिंदू समाजाने उदयपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ जयपूरमध्ये 3 जुलै रोजी (आज) मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
28 जून रोजी उदयपूरमध्ये दोघांनी एका टेलरची गळा चिरून हत्या केली होती. या घटनेनंतर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून इस्लामच्या अपमानाचा बदला घेत असल्याचे म्हटले आहे. टेलरच्या ८ वर्षांच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगण्यात आले. याचा राग येऊन आरोपीने वडिलांची निर्घृण हत्या केली.