नवी दिल्ली : कोरोनाने अख्ख्या जगाला हतबल केले आहे. या नव्या विषाणूवर अनेक संशोधन करण्यात येत आहेत. असेच एक संशोधन ब्रिटनमध्ये पार पडलव असून या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, नऊ दिवसानंतर कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी असतो असे सांगण्यात आले आहे. याचाच अर्थ जर एखाद्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असेल, तर त्या व्यक्तीमुळे केवळ नऊ दिवसांपर्यंतच इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो. हा खुलासा ब्रिटनमधील रुग्णांवर करण्यात आलेल्या संशोधनानंतर करण्यात आला आहे.
एका वृत्तसंस्थेने या विषयी माहिती दिली आहे. त्यानुसार या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, नऊ दिवसानंतर विषाणू शरीरात राहतो. परंतु, त्यामुळे इतरांना संसर्ग होत नाही. नऊ दिवसांनी कोरोनाचा कान, नर्वस सिस्टिम आणि हृदयावर परिणाम होतो. परंतु, त्याचा धोका कमी असतो. रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर 17 ते 83 दिवसांमध्ये व्हायरस रुग्णाच्या घशात पोहोचतो. संशोधकांचे असे म्हणणे आहे की, संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज देण्यासाठी फायदेशीर ठरतील आणि हे निष्कर्ष लक्षात घेऊन वैद्यकीय सुविधा पुरवल्यामुळे रुग्णांना अधिक फायदा होईल.
संशोधक मुगे केविक आणि एंटोनिया हो यांचे म्हणणे आहे की, संसर्ग होण्याआधी रुग्णांच्या शरीरात लक्षणं जास्त दिसून येतात. याचा अर्थ आहे की, जोपर्यंत त्यांची चाचणी केली जाते, तोपर्यंत त्यांनी संसर्गाचा सर्वात गंभीर टप्पा पार केलेला असतो. संशोधकांचं असं म्हणणं आहे की, त्यामुळे जसं तुम्हाला कोरोनाची लागण झाल्याचं तुमच्या लक्षात येईल त्यावेळी लगेच विलगीकरणात राहणं गरजेचं असतं. लक्षणं नसलेल्या रुग्णांना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यामुळे इतरांना सर्वाधिक संसर्ग होऊ शकतो.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कोरोनामुळे जे रुग्ण आठवडाभरापर्यंत व्हेंटिलेटरवर असतात. त्यांच्यात अशक्तपणा आणि स्नायूंमध्ये वेदना यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याच काळापर्यंत संसर्गाचा सामना करणाऱ्या व्यक्ती आतून अत्यंत अशक्त असतात. ब्रिटनमधील एका मोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, COVID-19 सोबतच आयसीयूमध्ये असणाऱ्या रुग्णांचे एक महत्त्वपूर्ण प्रमाण “एक्सोनल मोनोअनुराइटिस मल्टीप्लेक्स” नावाची एक तंत्रिका विकसित करते. ज्यामध्ये गंभीर वेदना, असंवेदनशीलता आणि स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदनांच्या समस्या उद्भवतात. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, आमचा आतापर्यंतच्या अनुभवानुसार, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये यांसारख्या समस्या दिसणे हे सामान्य आहे.