हॉटेल, रेस्टॉरंटसाठी केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जारी

नवी दिल्ली : केंद्र  सरकारकडून तब्बल दोन महिन्यांनंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारने धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियम व अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत.

हॉटेल खुली करण्याची परवानगी देतानाच सरकारने करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही महत्त्वाचे नियम घातले आहेत. यात ग्राहकाने स्वतःच्या मेडिकल व ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती देणे अनिवार्य केले  आहे.

* हॉटेल सुरु करण्यासाठी काय आहेत नियम…

* हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या ग्राहकानं स्वतःची मेडिकल हिस्ट्री व ट्रॅव्हल हिस्ट्री याची माहिती देणं बंधनकारक आहे. हॉटेलमधील वॉशरुम स्वच्छ ठेवण्यात यावे.

* हॉटेलमधील कर्मचाऱ्याच्या जाण्या येण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात यावे. त्याचबरोबर वयस्कर कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना लोकांच्या संपर्कात येण्यापासून टाळावे.

* हॉटेलमधील एसी सुरू ठेवण्याबद्दल सरकारकडून महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार हॉटेलमधील तापमान संतुलित ठेवण्यासाठी एसी २४ ते ३० डिग्रीमध्ये ठेवावा. त्याचबरोबर ४० ते ७० आद्रता राहिल याची काळजी घ्यावी.

* रेस्टॉरंटसाठी  नवीन  नियम

* खाद्यपदार्थाची डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाने हातात पार्सल देणे टाळावे. त्याऐवजी दरवाज्यावर किंवा टेबलावर ठेवावे.

* रेस्टॉरंटच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना प्रवेश द्यावा. त्यामध्ये सोशल डिस्टसिंगचे  पालन केले जावे.

*  ग्राहक रेस्टॉरंटमधून गेल्यानंतर तो ज्या ठिकाणी बसला आहे, ती जागा सॅनिटाइज करणे  बंधनकारक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.