शेअर बाजाराचा नवा रेकॉर्ड; सेन्सेक्स पहिल्यांदाच ३९ हजार पार 

मुंबई – आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारमध्ये रेकॉर्ड प्रस्थापित झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने पहिल्यांदाच ३९ हजार आकडा पार केला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही ११,७०० आकडा पार केला. सेन्सेक्सने ३२३.५२ अंकांनी वाढून ३९ हजार आणि निफ्टीमध्ये ८० अंकांनी वाढ होऊन ११,७०३च्या पुढे गेला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे व्याजामध्ये कपात करण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच या आठवड्यात अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यामुळे शेअर बाजारात सकारात्मक संकेत मिळत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.