मुंबई – आयपीएल स्पर्धेत हिट ठरलेला मुंबईचा लेग स्पिनर प्रवीण तांबे याच्या नावावर अगळावेगळा विक्रम जमा झाला आहे. 48 वर्षांच्या प्रवीण तांबेने पुनर्निवृत्ती जाहीर करताना कॅरेबियन लीग टी-20 स्पर्धेतील एका संघाशी करार केला. हा करार करणारा तांबे भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
त्रिनबॅगो नाइट रायडर्स संघाशी तांबेने करार केला आहे. कोणत्याही क्रिकेटपटूला निवृत्ती स्वीकारल्याशिवाय परदेशातील लीगमध्ये खेळता येणार नाही, असा बीसीसीआयचा नियम असल्याने तांबेने निवृत्ती स्वीकारली होती. मात्र, निवृत्तीचा निर्णय मागेही घेतला होता.