मुंबई – अजय देवगनने आपला आगामी चित्रपट ‘द बिग बुल’चे नवीन पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट या वर्षी 2 अक्टोबरला रिलीज होणार आहे. चित्रपटात अजयसह अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूज यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाने दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे.
7 वर्षांनंतर अजय देवगन आणि अभिषेक बच्चनची जोडी मोठ्या पडद्यावर येत आहे. यापूर्वी दोघांनी 2012 मध्ये आलेल्या राहित शेट्टीचा हिट कॉमेडी चित्रपट ‘बोल बच्चन’ मध्ये काम केले होते. गेल्या सप्टेंबरमध्ये अभिषेकनेही या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत शूटिंगची माहिती दिली होती.