सोलापूरसाठी हैदराबादहून येणार नवीन मतदानयंत्रे

सोलापूर,(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हैदराबाद येथून “इसीआयएल’ कंपनीची अद्ययावत तंत्रज्ञानाची नवीन मतदानयंत्रे येणार आहेत, अशी माहिती नूतन उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी दिली.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांची कोल्हापूरला बदली झाल्याने त्यांच्या जागी कोल्हापूर येथून भोसले या सोमवारी रुजू झाल्या आहेत. त्यांनी पदभार घेतल्यानंतर मतदानयंत्रे व व्हीव्हीपॅट यंत्रांचा आढावा घेतला.

8 हजार 97 बॅलेट युनिट व 4 हजार 708 कंट्रोल युनिट इसीआयएल कंपनीकडून उपलब्ध होणार आहेत. 5 हजार 86 व्हीव्हीपॅट यापूर्वीच दाखल झाले आहेत. बेल कंपनीची मतदानयंत्रेही दाखल झाली होती. परंतू ही यंत्रे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे आता इसीआयएल कंपनीची नवीन यंत्रे सोलापूरसाठी मिळणार आहेत. येत्या 24 फेब्रुवारीपर्यंत ही यंत्रे मिळणे अपक्षित आहेत.

या यंत्रांच्या प्राथमिक तपासणीसाठी इसीआयएल कंपनीचे तीन अभियंते सोलापुरात आले असून आणखी 39 अभियंते येणार आहेत, असेही भोसले यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.