नवी दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टअंतर्गत बनवण्यात येत असलेल्या भारताच्या नव्या संसदेचे आज उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या दरम्यान सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सकाळी 7.15 ते 9.30 आणि दुपारी 11.30 ते 2.00 अशा दोन टप्प्यांमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत.
संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचं वेळापत्रक खालील प्रमाणे
सकाळचे सत्र –
सकाळी 7.15 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवीन संसद इमारतीत आगमन
सकाळी 7.30 वाजता : हवन आणि पूजापाठ कार्यक्रम (जवळपास एक तास)
सकाळी 8.30 वाजता : पंतप्रधान मोदी यांचं लोकसभेच्या सभागृहात आगमन
सकाळी 9.00 वाजता : लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोलची प्रतिष्ठापना
सकाळी 9.30 वाजता : लॉबी परिसरात प्रार्थना कार्यक्रम.
कार्यक्रम संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळावरून रवाना होतील.
दुपारचे सत्र –
दुपारी 11.30 वाजता : प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचे आगमन
दुपारी 12.00 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन. राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात
दुपारी 12.10 वाजता : राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश यांचं भाषण. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचा संदेश वाचून दाखवण्याची शक्यता.
दुपारी 12.17 वाजता : दोन शॉर्ट फिल्मचं प्रदर्शन
दुपारी 12.38 वाजता : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते यांचं भाषण (उपस्थित असल्यास). त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे भाषण.
दुपारी 01.05 वाजता : 75 रुपयांची नाणी आणि स्मरणचिन्हाचं प्रकाशन
दुपारी 01.10 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण.
दुपारी 02.00 वाजता : उद्घाटन सोहळ्याची सांगता.