वीस रुपयांची नवी नोट : जुन्या नोटा सुद्धा चलनात राहणार

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँक २० रुपयांची नवी नोट चलनात आणत असून ही नोट फिक्कट हिरव्या पिवळसर रंगाची असणार आहे. महात्मा गांधी सीरिजमधील या नोटेच्या दुसऱ्या बाजूला देशाच्या सांस्कृतिक वारशाचे महाराष्ट्रातील औरंगाबाद मधील एल्लोर गुफांना स्थान देण्यात आले आहे.

नोटेवर विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी आहे. ही नोट चलनात आल्यानंतरही आधीच्या २० रुपयाच्या सर्व नोटा चलनात कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकने स्पष्ट केले आहे. या नवीन नोटेचा आकार ६३ मि.मी. x १२९ मि.मी. इतका आहे.

२० रुपयाच्या नव्या नोटेची वैशिष्ट्ये –

* २० हा अंक नोटेच्या खालील बाजूस असेल.
* देवनागरी लिपीतील २० हा अंक गांधीजींच्या फोटोच्या डाव्या बाजूला असेल.
* मध्यभागी गांधीजींचा फोटो असेल.
* सूक्ष्म अक्षरांत RBI भारत, INDIA आणि २० चा उल्लेख करण्यात आला आहे.
* गांधीजींच्या फोटोच्या उजव्या बाजूला गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी व हमी देणारा संदेश असेल.
* नोटेच्या अगदी उजवीकडे अशोक स्तंभाला स्थान देण्यात आले आहे.
* नोटेच्या मागील बाजूस एल्लोर गुहेचे चित्र आहे.
* तिथेच बाजूला स्वच्छ भारत मोहिमेचे चिन्ह आणि संदेश आहे.
* अगदी डावीकडे नोटछपाईचे वर्ष देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.