“ब्रेक्‍झिट’ बाबत नव्याने वाटाघाटी

ब्रुसेल्स – युरोपिय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबत ब्रिटन आणि युरोपिय संघाने नव्याने वाटाघाटीस तयारी दर्शवली आहे. “ब्रेक्‍झिट’बाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि युरोपियन कमिशनचे प्रमुख जीअन क्‍लाउड जंकर यांच्यात ही चर्चा होणार आहे. ब्रुसेल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या संयुक्‍त निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

युरोपिय संघातून बाहेर पडण्याबाबत नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या कराराबाबत फेर वाटाघाटी केल्या जाऊ शकणार नाही, असे जंकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. या करारातील उल्लेखानुसार आयरिश सीमेबाबतच्या तरतूदींबाबत फेरचर्चेची आपल्याला आशा असल्याचे थेरेसा मे यांनी म्हटले होते. त्यानंतर जंकर यांनी भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)