मुंबई – बॉलिवूडमधील अभिनेत्री एकदा आई झाली की लवकर मोठ्या पडद्यावर परतत नाहीत. एखाद्या दुसऱ्या चित्रपटात पाहुनी कलाकार म्हणून झळकतात आणि किमान ३ ते ५ वर्षानंतर सिनेमात येण्याचा विचार करतात. साऊथ इंडस्ट्रीच्या बाबतीत मात्र तस नाही. २ महिन्यांपूर्वी आई झालेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता सुभाषने याचे उत्तम उदाहरण सर्व अभिनेत्रींनसमोर ठेवले आहे.
अभिनेत्री प्रणिता 2 महिन्यांपूर्वीच आई झाली असून सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिने दैनंदिन वर्कआउट्स वगळले होते पण आता ती रुटीनमध्ये येत आहे. नुकतंच, अभिनेत्रीने तिची हार्डकोर वर्कआउट पोस्ट शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जे पाहून चाहते चांगलेच इम्प्रेस झाले आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्रीने स्ट्रेंथ वर्कआउटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या जिम ट्रेनरसोबत दिसत आहे. फोटो पाहून काही यूजर्स तिला विचारत आहेत की, हा तुझा नवरा आहे का ? फोटोमध्ये, वर्कआउट केल्यानंतर प्रणिताच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसत आहे.एका युजरने तर बॉलिवूडमधील करीनासह इतर अभिनेत्रींचे उदाहरण दित हे फक्त साऊथ इंडस्ट्रीच करू शकते,’बॉलिवूड की बस की बात नही’ असा टोमणा मारला आहे.