महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. दरम्यान, यावेळी ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं आहे. पूर्णपणे भगव्या रंगाच्या या ध्वजावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता, शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” हे शब्द या राजमुद्रेवर आहेत.
#मनसेध्वज #मनसे_अधिवेशन #राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #RajThackeray #MaharashtraDharma #Hindaviswarajya pic.twitter.com/OtEDCphJCO
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020
दरम्यान, या अधिवेशनातच राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा नवीन रुपात सादर केला. पक्षाच्या धोरणांबद्दल मी संध्याकाळी बोलेन, असं सुद्धा राज ठाकरे यावेळी म्हणाले.