चेन्नई – तामिळनाडुच्या अलगप्पा महाविद्यालय आणि स्वीडनच्या केडीएच रॉयल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधानुसार संशोधकांनी औषधं आणि मिश्रणांची एक सुची तयार केली आहे. यांवर संक्रमणाच्या उपाचारांच्या अनुशंगाने चाचणी केली जाणार आहे. ‘साइंटिफिक रिपोर्ट्स’ या जर्नलमध्ये लेख प्रकाशित करण्यात आला आहे.
‘ड्रगबँक’ आकड्यांच्या अध्ययनावर आधारीत हा शोध जर्नल ‘साइंटिफिक रिपोर्ट्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस कोणत्या पद्धतीने हल्ला करतो, याबाबत अधिक परिक्षण सुरू आहे. या संशोधनाचे प्रमुख वैभव श्रीवास्तव आणि अरूल मुरुगन यांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन उपचारपद्धतीमुळे व्हायरसचा प्रसार कमी होण्यासाठी मदत होईल.
श्रीवास्तव यांनी सांगितले की, व्हायरस खूप वेगाने आपला प्रसार वाढवत आहे. कारण व्हायरस प्रोटीनमध्ये सतत बदल होत असतो. श्रीवास्तव यांनी सांगितले की, अशा कोणत्याही औषधामुळे व्हायरसच्या अनेक प्रोटिन्सचा नष्ट करता येऊ शकतं. असे गुण उपलब्ध असतील अशी वेगवेगळी औषध शोधण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे.
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या लसीकरणाची तयारी तरी सरकारकडून सुरू असतील तर कमी कालावधीत सगळ्यांनाच लस मिळणं कठीण आहे. काही लाख लोकांनाच लस मिळू शकते. त्यात फ्रंटलाईन व्रर्कर्स, आरोग्यसेवेतील कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. भारतीय वैज्ञानिकांनी आता कोरोनावर प्रभावी ठरतील अशी औषधं आणि संभाव्य उपचारांचा शोध लावला आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधांनी कोरोनाच्या उपचारासाठी मदत होईल.