तेजीवाल्यांना नव्या पातळ्यांची साद

मागील सोमवारच्या सुटीनंतर बाजारात तेजी दिसून आली. 18 ऑक्‍टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताची परकीय चलन थैली 1.4 अब्ज डॉलर्सनं वाढून आजपर्यंतच्या सर्वोच्च म्हणजे 440.75 बिलियन अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे या वृत्तामुळं बाजारावरील तेजीची पकड कायम राहिली.

पुढच्याच दिवशी परकीय थेट गुंतवणुकीबाबतची धोरणं शिथिल करण्याबद्दलचं सूतोवाच आणि लाभांशावरील कर मागं घेण्याबाबत व दीर्घमुदत भांडवली नफ्यावरील करासंबंधी अर्थमंत्र्यांनी दाखवलेला सकारात्मक पवित्रा बाजार वरती राहण्यास कारणीभूत ठरला. जरी शेवटच्या दोन दिवसांत नफेखोरीस प्राधान्य दिसून आलं तरी, गेल्या आठवड्यात निफ्टीनं सव्वादोन टक्क्‌यांची तर सेन्सेक्‍सनं सुमारे 1000 अंशांची तेजी अनुभवली.

11700 ही प्रतिकार पातळी ओलांडल्यावर लागलीच निफ्टीनं वरील बाजूस झेप मारलेली आढळून आली. आता 11700 व 11550 हे निफ्टीचे पुढील वाटचालीसाठी नजीकचे आधार संभवतात तर 12000 व 12200 ह्या पातळ्या, समोरील आव्हानं. लांबचाच विचार केला तर 12700 व 13300 ह्या पातळ्या तेजीवाल्यांना साद घालत नसतील तरच नवल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.