नवी दिल्ली – दिल्ली आणि परिसरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने गुरूवारी एक अध्यादेश जारी केला आहे. यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास पाच वर्षे जेल अथवा एक कोटी रूपये दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा एकाचवेळी केली जाण्याची तरतूद या अध्यादेशात करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी या अध्यादेशावर स्वाक्षरी केली असून तो तात्काळ लागू झाला आहे. दिल्ली आणि लगतच्या परिसरात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांचाही समावेश करण्यात आला असून तेथेही कायदा लागू राहणार आहे.