नगर एमआयडीसीत नवीन आयटी कंपनी

नगर – युनिव्हर्सल सेक्‍युरीटी सिस्टीम आणि के.एस आय टी सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड या कंपनींच्या माध्यमातून आर एफ आय डी. कोडींग च्या विविध प्रकारचे कार्ड निर्मिती आज पासून सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीचे संचालक नरेंद्र बंडारू यांनी दिली. ज्या-ज्या ठिकाणी बारकोड, क्‍युआर कोड वापरला जातो त्या -त्या ठिकाणी आर एफ आय डी कोड वापरता येवू शकतो. तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी कंपन्यांसाठी आणि अन्यत्र सुद्धा आर एफ आय डी कोड वापरता येवू शकेल.

अश्‍याप्रकारची सुविधा देणारी ही देशातील पहिलीच कंपनी आहे, या कार्ड मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप मात्र चीन मधुन मागविल्या जातात त्यानंतर ग्राहकांच्या पसंती नुसार आकर्षक रीस्टबॅंड, किचैन अथवा विविध प्रकारात या चीप बसवून दिल्या जातात. एका तासात साडे चार हजार आर एफ आय डी कार्डस बनविण्याची क्षमता आहे. त्यासाठी 200 कुशल कामगारांची गरज असून तशी भरतीही या कंपनीने सुरू केली आहे. सध्या 20 कर्मचारी येथे काम करेत आहेत.

आंध्र ,तेलंगणा राज्यात हीच कंपनी12 वर्षापासून ही सुविधा देत असून त्यांनी आता या कार्डचे प्रोडक्षन सुरू केले आहे अशी सुविधा पुरविणारी ही देशातील पहिलीच कंपनी आहे.या कंपनी मुळे स्थानिक अर्थकारणाला चालना मिळेल असे सांगितले. यावेळी नरेंद्र बंडारू .राजेश आठरे, शुभम गांधी,गौरव शेटे आही उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.