मुंबई – “अवंतिका’ मालिकेतील सानिका असो, “आंबट गोड’मधील इंदू, “स्वराज्य रक्षक संभाजी’तील आदरणीय “सकवारबाई’ अगदी सध्या चालू असलेल्या “मुलगी झाली हो’मधील उमा असो अशा विविध माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री-लेखिका शर्वाणी पिल्लई आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. पॅलेट मोशन पिक्चर्स असे तिच्या निर्मिती संस्थेचे नाव आहे.
“वर्दे आणि सन्स’ या आगामी लोकेश गुप्ते दिग्दर्शित वेब सीरिजची निर्मिती पॅलेट मोशन पिक्चर्स करत असून अभिजित खांडकेकर, उपेंद्र लिमये, रेशम श्रीवर्धन, दीपक करंजीकर अशी दमदार कलाकार मंडळी या वेबसीरीजच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहेत.