नारायणगाव सारख्या पुणे-नाशिक महामार्गावरील, जुन्नर तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि बाजारपेठेच्या गावात नागरिकांच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक सुविधा देण्याचे सर्व श्रेय जानेवारी पासून सुरु केलेल्या डॉ. मनोहर डोळे मेडिकल फौंडेशन संचलित अथर्व नेत्रालयाकडे जाते. आजच्या प्रदुषित, हवेत धुळीचे प्राबल्य असलेल्या वातावरणात आणि कम्प्युटर्स, मोबाईएल स्क्रीनच्या अतिवापराच्या काळात डोळ्यांचे आरोग्य हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. पारंपरिक उपचार पद्धतीच्या मर्यादा आणि ग्रामीण भागातील अत्याधुनिक उपचार या सुविधाचा विचार करता अथर्व नेत्रालयात मिळणाऱ्या सुविधा खरोखरच वाखाणण्याजोग्या आहेत.
ज्या रुग्णांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे, अशांना रेटीनामध्ये रक्तस्त्राव होतो. त्यांच्यासाठी अथर्व नेत्रालयामध्ये “ग्रीन लेसर’द्वारे उपचार दिला जातो. मधुमेह अथवा उच्च रक्तदाबामुळे अनेकदा दृष्टी अधु होत जाते किंवा नेत्रपटलामध्ये दोष निर्माण होतो. अशावेळी डोळ्यांचे सीटी स्कॅन (ओसीटी) करुन योग्य तो उपचार दिला जातो. अनेकदा काही रुग्णांमध्ये मागील पडदा निसटणे किंवा त्यावर रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्याने नजरही कमजोर होते. अशा रुग्णांसाठी व्हिक्ट्रेक्टॉमी मशिनद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. याशिवाय डोळ्यांची सोनोग्राफीही करण्याची सोय येथे आहे. डोळ्यांची अँजिओग्राफी केल्यास आजाराचे अचूक निदान करता येतेच. शिवाय डायबेटीक रेटिनोपॅथीसारख्या गुंतागुंतीच्या आजारावर लेसर उपचार करता येतात. त्यासाठी फंडस ऍन्जिओग्राफी आणि ग्रीन लेसर ही अत्याधुनिक उपकरणे अथर्व नेत्रालयामध्ये उपलब्ध आहेत.
कॉम्प्युटराईज्ड नेत्रतपासणी, लेसर मशिनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, एन-डी याग लेसर उपचार, डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या प्लॅस्टीक सर्जरीज, डोळ्यांच्या पापणीवरील शस्त्रक्रिया तसेच नेत्रदानानंतर दुसऱ्या व्यक्तीला नेत्रपटल बसवण्याची नेत्ररोपण शस्त्रक्रिया या सर्वांसाठी अथर्व नेत्रालयची ख्याती परिसरात आहेच. शिवाय कॉन्टेक्ट लेन्स क्लिनिकची सुविधाही येथे देण्यात येते. तसेच ऑप्टिशियन आणि मेडिकल स्टोअर्सही रुग्णांचा सोयीसाठी उघडण्यात आले आहे. लहान मुलांसह सर्व वयोगटातील रुग्णांची नेत्रतपासणी आणि त्यासंबंधित उपचारासाठी या भागातील रुग्णांचे हक्काचे ठिकाण म्हणजेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एकमेव अत्याधुनिक अथर्व नेत्रालय होय.
या आहेत हॉस्पिटलमध्ये सुविधा…
- कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी
- नेत्रालयामध्ये ग्रीन लेसर
- फेको व लेसर मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया
- सुसज्ज ऑपरेशन थिएटर
- डोळ्याच्या मागील पडद्यांची (रेटिना)
- विशेष तपासणी व शस्त्रक्रिया
- व्हिट्रेक्टॉमी मशीन
- पेरीमेटरी मशीन (काचबिंदू तपासणी)
- ओ सी टी (डोळ्यांचे सिटी स्कॅन) व सोनोग्राफी मशीन आदी सुविधा आहेत.
डोळ्याच्या पापणीवरील शस्त्रक्रिया (प्लॅस्टिक सर्जरी), एन-डि याग लेसर द्वारे उपचार, तिरळेपणावरील तपासणी व शस्त्रक्रिया, ऑप्टिशियन व मेडिकल स्टोअर सुविधा, कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक
जगातील अतिआधुनिक लेसर मशीन (फेको) म्हणजेच बिना टाका, बिना पट्टी, बिना भूल लेसर द्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, “नवी आशा, नवी सृष्टी, डोळ्यांच्या आरोग्याची नवी दृष्टी’ हे घोषवाक्य सार्थ करणारे अथर्व नेत्रालय गेली अनेक वर्षे रुग्णसेवेत कार्यरत आहे.