नवा उच्चांक ! पेट्रोल @120 तर डिझेल 109 रुपयांच्या पुढे

नवी दिल्ली – इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. दररोज बदलणारे दर आणि त्यातून समोर आलेली इंधन दरवाढ आता नवनवीन उच्चांक करताना दिसत आहे. देशातील काही भागात आज पेट्रोलने नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची अवस्था आणखीच बिकट होण्याची चिन्हे आहेत.

आजही पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) वाढले आहेत. पण आजच्या वाढीने नवा रेकॉर्ड सेट केला आहे. देशातील अनेक शहरात 120 रुपये प्रति लीटरपर्यंत पेट्रोलचे दर पोहोचले आहेत. आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 17 वेळा वाढवण्यात आले आहेत.

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पहिल्यांदा पेट्रोल 119.05 रुपये आणि डिझेल 109.88 प्रति लीटरवर पोहोचले आहे. तर मध्य प्रदेशातील अनुपपूरमध्ये पेट्रोलची किंमत 118.35 रुपये प्रति लीटर झाली आहे. तर डिझेल 107.50 रुपये आहे. तसेच सतनामध्ये प्रीमियम पेट्रोलची किंमत 120 रुपयांच्या पुढे गेली आहे आणि डिझेल देखील 105.67 प्रति लीटरने विकले जात आहे.

दरम्यान मुंबईत पेट्रोल 112.78 रुपये आणि डिझेल 103.63 रुपये प्रति लीटर मिळत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.